S M L

राष्ट्रवादीच्या आत्मचिंतन बैठकीत पवारांचे नेत्यांना खडे बोल

6 जून, मुंबई अमेय तिरोडकरराष्ट्रवादीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत शरद पवारांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची जोरदार कानउघडणी केली आहे. काही मंत्र्यांना तर काम सुधारा नाहीतर कारवाईला सामोरं जा असं स्पष्टपणे सांगितलं आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीचा आत्मचिंतनाचा वर्ग होता. पण शरद पवारांनी सगळ्यांची जोरदार हजेरी घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार ते फक्त 6 मंत्र्यांवरच खूश होते. छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर, बबनराव पाचपुते, गणेश नाईक आणि नवाब मलिक यांच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं तर, इतरांना चांगलं काम करून दाखवा नाहीतर कारवाई करावी लागेल, असं स्पष्ट शब्दात सांगितलं. खुद्द पवारांनीच पाठीवर थाप मारल्यामुळे भुजबळ फॉर्मात आले. मराठा आरक्षणाच्या सकारात्मक भूमिकेचा पक्षाला काय फायदा झाला, असा सवाल विचारत त्यांनी पक्षातल्या एका गटाला धारेवर धरल्याचं वृत्त आहे. या बैठकीविषयी आर.आर.पाटील यांना विचारलं त्यांनी, चुका काय झाल्या आहेत याची निरनिराळी कारणं आहेत. ती आम्ही शोधून काढू, असं सांगितलं आहे. पक्षाचे खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे खून प्रकरणात संशयाचं बोट ठेवलं गेलं आहे. बैठक संपल्यावर पद्मसिंह पवारांच्या सोबतच होते. पक्षानेही सीबीआय चौकशी होईपर्यंत पद्मसिंहांच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं आहे. येत्या 17 जूनला राष्ट्रवादीची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. पण या चिंतनांच्या बैठकांतून पक्षाची चिंता कमी होईल का हा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2009 09:17 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2009 09:17 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close