S M L

भाजप अल्पमतातलं सरकार स्थापन करण्याच्या तयारीत?

Samruddha Bhambure | Updated On: Oct 25, 2014 06:48 PM IST

bjp support

25 ऑक्टोबर :  राज्यात कोणाचे सरकार येणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असताना भाजपने युटर्न घेतला आहे. भाजप राष्ट्रवादीला सोबत घेणार असल्याचे सांगण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार अल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. अल्पमतात सरकार स्थापन करण्याचा दावा भाजप करणार आहे. गेले अनेक दिवस शिवसेनेला सोबत घेऊन भाजप सत्ता स्थापन करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.  मात्र त्यांना भाजपकडून चांगलाच दणका दिला जाण्याची शक्यता आहे.

नागपूरमध्ये संघ मुख्यालयात आज राजकीय हालचालींना वेग आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनीही काल रात्री उशीरा भागवत यांची भेट घेतली. राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी यावरुन सुरू असलेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची होती. पण ही दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट होती, असा दावा गडकरींनी यावेळेस केला आहे. तर दुसरीकडे विनोद तावडे यांच्या घरी फडणवीस यांनी भेट घेतली.

त्यामुळे भ्रष्टवादी असा उल्लेख करणार्‍या भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याचे जवळपास निश्चित केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याच पाठिंब्याने राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा भाजप करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, स्थिर सरकार हवं असेल तर राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका असा सल्ला मित्रपपक्षांनी भाजपला दिला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 25, 2014 06:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close