S M L

ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती अत्यवस्थ

Samruddha Bhambure | Updated On: Oct 25, 2014 07:26 PM IST

ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती अत्यवस्थ

25 ऑक्टोबर : ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अमरापूरकर यांना फुफ्फुसांचा विकार झाल्याचे डॉक्टरांतर्फे सांगण्यात आलं आहे. त्यांचा लंग फायब्रोसिसचा त्रास वाढल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 63 वर्षांचे अमरापूरकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांत लक्षवेधी भूमिका केल्या असून 'सडक' या हिंदी चित्रपटातील तृतीयपंथीयाची भूमिका विशेष गाजली. त्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. एक उत्कृष्ट अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेले अमरापूरकर यांची सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही विशेष ओळख आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 25, 2014 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close