S M L

वडाळ्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Sachin Salve | Updated On: Oct 26, 2014 05:18 PM IST

rape26 ऑक्टोबर : मुंबईतील वडाळा भागात एका 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराची खळबळजनक घटना घडलीये. बलात्कार केल्यानंतर आरोपी फरार झालाय. वडाळा टी.टी.पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

वडळा इथल्या शांतीनगरमध्ये पीड़ित मुलीच्या वडिलाचे स्वीट मार्टचे दुकान आहे. रविवारी रात्री ही मुलगी दुकानासमोर फटके उडवत असताना एका अनोळखी माणूस तिला घेऊन गेला. पीड़ित मुलीच्या वडिलांनी ही बाब लक्षात आल्यावर मुलीचा शोध घेतला. मुलगी सापडत नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. रात्री दीड वाजेच्या सुमारास मुलगी त्या पालकांना दिसली तिची चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तिला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पथक आरोपीचा शोध घेत आहे. असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गरुड़ यानी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2014 03:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close