S M L

आम्ही काय पाकिस्तानी आहोत का? -रावते

Sachin Salve | Updated On: Oct 26, 2014 08:57 PM IST

आम्ही काय पाकिस्तानी आहोत का? -रावते

ravate on tawade26 ऑक्टोबर : भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत त्यामुळे सरकार स्थापन करण्याचा अधिकार आहे. पण अटीशतीर्ंची भाषा करायला आम्ही काय पाकिस्तानी आहोत का ? असा संतप्त सवाल शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी भाजपला विचारलाय. सगळ्या हिंदुत्ववादी शक्तींनी एकत्र आलं पाहिजे असं सूचक विधानही रावते यांनी केलंय.

सरकार स्थापनेसाठी शिवसेनाला सोबत घेण्याची हालचाल भाजपच्या नेत्यांनी सुरू केली आहे. पण शिवसेनेनं मंत्रिपदासाठी जास्त अटी घालू नये असा सल्लावजा टोला भाजपचे नेते विनोद तावडे यांनी लगावला होता. विनोद तावडे यांच्या विधानाचा समाचार घेत सेनेचे नेते दिवाकर रावते यांनी भाजपला खडा सवाल केला. तावडे काय बोलले ते बोलले. आता त्यांच्या जास्त जागा आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करण्याचा घटनेनुसार पूर्ण अधिकार आहे. पण आम्ही काही पाकिस्तानी आहे का?, अटीशतीर्ंची भाषा करायला. विनोद तावडे यांच्याकडे काय पूर्ण कमान दिली आहे का ? आता उद्या राजनाथ सिंह येत आहे त्यांच्याशी बोलणी होईल आणि पुढे काय ते ठरले अशी स्पष्टोक्ती रावते यांनी दिली. उद्या काळात काय दडलं आहे हे मला माहिती नाही. आता एमआयएम संघटना पुढे आली आहे. त्यामुळे सगळ्या हिंदुत्ववादी शक्तींनी एकत्र आलं पाहिजे असंही रावते म्हणाले. त्याचबरोबर अल्पमतातलं सरकार स्थापन करणं हे शक्य आहे. पण असं सरकार चालवणं अवघड आहे असा टोलाही रावते यांनी भाजपला लगावलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2014 08:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close