S M L

भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोविंद राठोड यांचे निधन

Samruddha Bhambure | Updated On: Oct 27, 2014 10:18 AM IST

भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोविंद राठोड यांचे निधन

27 ऑक्टोबर : नांदेड जिल्ह्यातील मुखेड मतदारसंघाचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोविंद राठोड यांचे रविवारी रात्री जालना येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.

आमदार गोविंद राठोड हे रविवारी रात्री देवगिरी एक्स्प्रेसने मुलगा गंगाधर राठोड यांच्यासह मुंबईला निघाले होते. दरम्यान, जालन्याजवळ सारवाडी रेल्वे स्थानकाजवळ आमदार राठोड यांच्या छातीत दुखू लागले. रेल्वे स्थानकात आल्यानंतर तत्काळ आमदार राठोड यांना नजीकच्या निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी आमदार गोविंद राठोड यांना मृत घोषित केले. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 72000च्या मताधिक्याने ते निवडून आले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2014 08:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close