S M L

बहुमतासाठी मतदान झालं तर राष्ट्रवादी गैरहजर राहणार - शरद पवार

Samruddha Bhambure | Updated On: Oct 27, 2014 01:04 PM IST

बहुमतासाठी मतदान झालं तर राष्ट्रवादी गैरहजर राहणार - शरद पवार

27 ऑक्टोबर :  भाजपला महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेसाठी विधानसभेत जेव्हा बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस त्याला गैरहजर म्हणजेचं तटस्थ राहील असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे.

सभागृहात बहुमतासाठी मतदान झाल्यास आम्ही त्यात सहभागी होणार नाही. जर असं केले नाही तर सहा महिन्यांत राज्यात पुन्हा निवडणूक होईल. हे टाळण्यासाठी आणि राज्यात स्थिर सरकार यावं यासाठी आपण हे पाऊल उचलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, निकाल पूर्णपणे लागायच्या आतच राष्ट्रवादीनं सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देऊ केला होता.

काय म्हणाले शरद पवार?

आमचा भाजपला पाठिंबाही नाही आणि विरोधही नाही. परिस्थिती आली आणि विधीमंडळात बहुमतासाठी मतदान झालं तर आम्ही अनुपस्थित राहू. सध्याचं संख्याबळ पाहता, आम्हाला हे करणं भाग आहे. नाहीतर महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकणार नाही आणि 6 महिन्यांत पुन्हा निवडणुका होतील. आम्हाला राज्यात स्थिर सरकार पहायचं आहे. पण सध्यातरी भाजप आणि शिवसेना सरकार स्थापनेसाठी एकत्र येताना दिसत नाहीत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2014 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close