S M L

ज्येष्ठ रंगकर्मी आणि कवी हबीब तन्वीर यांचं निधन

8 जून हिंदी नाटककार , दिग्दर्शक, कवी ,अभिनेता अशा अनेक भूमिका साकार केलेले कवी हबीब तन्वीर यांचं भोपाळच्या नॅशनल हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. गेल्या एक महिन्यापासून श्‍वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. अखेरी सकाळी साडेसहा वाजता त्यांची प्राण ज्योत मावळली. छत्तीसगढमधील रायपूर इथे 1923 साली त्यांचा जन्म झाला होता. हबीब अहमद खान यांच्या कविता तन्वीर या नावाने प्रसिध्द झाल्या आहेत. इंग्लडमधून 1955 साली त्यांनी रॉयल अकादमी ऑफ ड्रामॅटीक आर्टस्‌मधून ऍक्टींगचे तसंच ब्रिस्टॉल ओल्ड विक थिएटर स्कूलमधून दिग्दर्शनाचं प्रशिक्षण घेतलं होतं. आपल्या नाटकांतून वेगवेगळ्या संकल्पना देण्यात त्यांचा हातखंड होता. 'आग्रा बाजार ', ' मिट्टी की गड्डी ', ' चरनदास चोर ', ' पोंगा पंडित ', ' शतरंज के मोहरे ' ही त्यांची नाटक खूप गाजलेली आहे. त्यांनी नऊ सिनेमांमधून काम केलं असून ऍटनबरो यांच्या ' गांधी ', नाना पाटेकरच्या ' प्रहार 'मध्ये भूमिका साकारलेल्या आहे. या शिवाय सिनेमांसाठी गीतलेखनही त्यांनी केलं आहे. ऑल इंडिया रेडिओवर ते निर्माते म्हणून काम करत होते. त्यांना 1969 साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना 1983 पद्मश्री आणि 2002 साली पद्मभूषण देऊन गौरविण्यात आलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2009 11:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2009 11:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close