S M L

धक्कादायक, नुकसान केलं म्हणून चिमुरड्याला बेदम मारहाण

Sachin Salve | Updated On: Oct 27, 2014 07:24 PM IST

 धक्कादायक, नुकसान केलं म्हणून चिमुरड्याला बेदम मारहाण

balmajur_ghatkopar27 ऑक्टोबर : कामात नुकसान केलं म्हणून एका चिमुरड्याला बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडलीये. मुंबईतील घाटकोपर इथंही घटना घडली. या प्रकरणी मालकाला अटक करण्यात आली आहे.

बालमजुरी विरोधात अनेक कायदे असले तरी अनेक ठिकाणी ते फक्त कागदावरच असतात असं आढळून आलंय. आणि या बालमजुरांना अमानुष वागणूक मिळत असल्याचंही दिसतं. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये गावदेवी परिसरात बालमजुरीचं विदारक चित्र समोर आलंय. या ठिकाणी एका चाळीत कपड्यांना झिप बसवण्याच्या कारखान्यात बालमजूर आहेत. त्यात एका 9 वर्षांच्या लहान मुलानं काम करताना नुकसान केलं म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. राजदीप चौधरी असं मारहाण करणार्‍याचं नाव आहे. आजुबाजूच्या नागरिकांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी या मुलाला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलिसांनी बालमजूर प्रतिबंधक कायद्यानुसार राजदीप चौधरीला अटक केलीये. हा लहान मुलगा मूळ बिहारचा आहे. त्याच्यासारखी आणखीही काही मुलं इथं आहेत. कपड्यांना झिप बसवण्याच्या कामाचे या मुलांना महिन्याला 1 हजार रुपये मिळतात. त्यासाठी त्याला रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं. कामात काही चूक झाल्यास मारहाण केली जाते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2014 07:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close