S M L

'राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा काहीतरी वेगळंच शिजतंय'

Sachin Salve | Updated On: Oct 27, 2014 11:32 PM IST

'राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा काहीतरी वेगळंच शिजतंय'

h patil27 ऑक्टोबर : भाजपने पाठिंबा न मागताही बिनशर्त पाठिंबा देवू करुन राष्ट्रवादीनं महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करण्याचा डाव मांडलाय यात काही तरी वेगळंच दिसतंय अशी टीका काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली. तसंच सुप्रिया सुळेंना लोकसभा निवडणुकीत मदत केल्याच्या बदल्यात राष्ट्रवादीने पराभव करुन दगा फटका केल्याचा आरोप पाटील यांनी केलाय.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पराभूत झाल्यामुळे दोन्ही पक्षांना एकच झटका बसला. काँग्रेससाठी माजी संसदीय कामकाज मंत्री आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव अनेपेक्षित होता. पराभवातून सावरल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी पहिल्यांदाच मीडियाशी बातचीत केली. माझा पराभव का झाला यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. पण हा पराभव नसून हा अपघात आहे. शेवटी हा जनतेचा कौल आहे आणि मला मान्य आहे असं सांगत पाटील यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादीने दगाफटका केल्याचा चांगलाच समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुप्रिया सुळे यांच्यासाठी आम्ही आघाडीचा धर्म पाळत प्रचार केला. त्यामुळे सुळे यांना इंदापूर, भोर आणि बारामतीमध्ये मोठी आघाडी मिळाली. पण असं असतांना तीन महिन्यात राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली असा आरोप पाटील यांनी केला. तसंच भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यात पण राष्ट्रवादीने अगोदर बिनशर्त पाठिंबा देऊ केला यात काहीतरी वेगळं शिजतंय असा संशयही पाटील यांनी व्यक्त केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2014 11:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close