S M L

काही तासांत राज्याला मिळणार नवे मुख्यमंत्री, फडणवीसांचं नाव निश्चित ?

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2014 03:45 PM IST

fadanvis on ncp video28 ऑक्टोबर : कोण होणार मुख्यमंत्री ? आता हे काही तासांत स्पष्ट होणार आहे. भाजपने सर्व तयारी पूर्ण केली असून आज (मंगळवारी) दुपारी 4 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची चिन्ह आहे.

भाजपच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. राज्याचा मुख्यमंत्री कोण ? हे आज दुपारी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत जाहीर होईल. मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार आहे. त्यासाठी पक्षाचे सर्व आमदार आणि राज्यातले खासदार पक्षाच्या कार्यालयात जमा व्हायला लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे थोड्याच वेळात दिल्लीहुन निघणार आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर ते आमदार आणि खासदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी 4 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर होईल. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. दरम्यान, निवडणूक प्रभारी ओम माथुर आणि महाराष्ट्र प्रभारी राजीवप्रताप रूडी हे दोन्ही नेतेही भाजपच्या कार्यालयात पोहचले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांचं नाव निश्चित झाल्यानंतर संध्याकाळी भाजप सत्तास्थापनेसाठी दावा करणार आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या भेटीची वेळही त्यासाठी घेण्यात आली आहे. साडेसहा वाजता भाजपचे नेते राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी जाणार आहेत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2014 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close