S M L

आमच्या कोणत्याही अटी-शर्ती नाहीत -संजय राऊत

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2014 01:26 PM IST

Sanjay raut28 ऑक्टोबर : आमच्या कोणत्याही अटी शर्ती नाहीत, त्यामुळे पुन्हा युती करायची असेल तर दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाले पाहिजे. शेवटी आमचा रक्तगट एकच आहे अशी नरमाईची भूमिका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मांडलीये. आमची युतीही 25 वर्षांपूर्वी झाली होती. गेल्या काहीकाळात आम्हीही चढउतार पाहिलेत. पण आमचे पाय जमिनीवर आहे असा टोलाही राऊत यांनी लगावला.

भाजप आज सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे. पण शिवसेनेचा पाठिंबा घेणार की राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. पण शिवसेनेनं सपेशल लोटांगण घेत भाजपला पाठिंबा दिला आहे. आज पुन्हा संजय राऊत यांनी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं स्पष्ट केलंय. तसंच त्यांच्याकडे जास्त जागा आहेत त्यामुळे त्यांमुळे त्यांना सरकार स्थापन करण्याचा अधिकार आहे पण आमच्याकडेही बहुमतासाठी आवश्यक जागा आहे अशी आठवणही राऊत यांनी करून दिली. दरम्यान, शिवसेनेशी अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे, अशी माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2014 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close