S M L

सेनेत उपमुख्यमंत्रिपदासाठी अनिल देसाईंचं नाव आघाडीवर?

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2014 04:25 PM IST

anil desai28 ऑक्टोबर : एकीकडे भाजप सत्तास्थापनेसाठी आज दावा करणार आहे तर दुसरीकडे शिवसेनेमध्येहीे हालचालींना वेग आलाय. 'मातोश्री'वर शिवसेनेच्या नेते जमले आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेंना गटनेतेपद मिळण्याची दाट शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास अनिल देसाईंचं नाव आघाडीवर आहे. अनिल देसाई हे उद्धव ठाकरेंचे जवळचे सहकारी आहेत विश्‍वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळालीय. दरम्यान, शिवसेनेनं आज आपली भूमिका आणखी मवाळ केली. युती होण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न झाले पाहिजेत, असं सेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. तर युतीचा निर्णय शिवसेनेनं घ्यायचाय, असं भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथूर यांनी म्हटलं आहे.

(सविस्तर बातमी लवकरच)

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2014 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close