S M L

फडणवीसांसह छोटे मंत्रिमंडळ शपथ घेणार -नड्डा

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2014 11:12 PM IST

फडणवीसांसह छोटे मंत्रिमंडळ शपथ घेणार -नड्डा

nadda28 ऑक्टोबर : देवेंद्र फडणवीस हे सक्षम नेते असून मुख्यमंत्रिपदाची धूरा ते नेटाने सांभाळतील. आता 31 तारखेला शपथविधी होणार असून त्यावेळी एक छोट मंत्रिमंडळ स्थापन केले जाईल नव्या मुख्यमंत्र्यांसह शपथही घेतील अशी माहिती भाजपचे नेते जे.पी.नड्डा यांनी दिली.

तसंच शिवसेनेनं सोबत यावं ही आमची इच्छा त्यासंदर्भात सेना नेत्यांशी चर्चा सुरू आहे लवकरच सुख:द बातमी येईल असंही नड्डा यांनी स्पष्ट केलं. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंंत्रिपदी निवड झाली.

आज झालेल्या विधिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपचे तमाम नेतेमंडळी उपस्थित होते. त्यानंतर नड्डा मीडियाशी बोलत होते. मात्र या छोट्या मंत्रिमंडळात कोण असणार आहे हे मात्र गुलदस्त्याच आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2014 08:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close