S M L

फडणवीसांसह 7 जण घेणार मंत्रिपदाची शपथ?

Samruddha Bhambure | Updated On: Oct 29, 2014 04:54 PM IST

फडणवीसांसह 7 जण घेणार मंत्रिपदाची शपथ?

29  ऑक्टोबर : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव नक्की झाल्यानंतर आता त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश असणार याची चर्चा रंगायला लागली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या 'मिनीमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स' या संकल्पनेनुसारच राज्यातील मंत्रिमंडळही छोटं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 31 ऑक्टोबरला होणार्‍या शपथविधी सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील त्यावेळेस त्यांच्यासह आणखी सहा जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

संभाव्य मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार?

देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री

  • एकनाथ खडसे - कॅबिनेट
  • सुधीर मुनगंटीवार - कॅबिनेट
  • विनोद तावडे - कॅबिनेट
  • गिरीष बापट : कॅबिनेट
  • विष्णू सावरा : कॅबिनेट
  • पंकजा मुंडे-पालवे : कॅबिनेट

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2014 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close