S M L

पद्मसिंहांबाबत राष्ट्रवादीत गोंधळ नेत्यांच्या वेगवेगळया भूमिका

10 जून पद्मसिंह पाटील यांच्याविषयी नेमकी कोणती भूमिका घ्यावी याबाबत पक्षाचे वरीष्ठ नेते संभ्रमात सापडले आहेत. तर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचं वातावरण दिसतंय.राज्याचे माजी गृहमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे मेव्हणे पद्मसिंह पाटील यांचा पक्षात मोठा दबदबा आहे. पवनराजे निंबाळकर हत्त्या प्रकरणात नाव आल्यानंतर काहीसे बाजूला झालेल्या पद्मसिंहांनी गेल्यावर्षी पुन्हा पक्षाकडे खासदारकीचा आग्रह धरला. आणि नुकत्याच झालेल्या निवडणूकीत ते उस्मानाबादमधून निवडूनही आले. पण खासदारकीची शपथ घेत नाही तोच पद्मसिंह CBI च्या जाळ्यात अडकले. त्यांना 7 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली. तरीही आपण निर्दोष असल्याचा दावा त्यांनी केला.'लोकांनी मला निवडून दिलं आहे, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. आपल्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत', असं पद्मसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. निवडणूकीनंतर दिल्लीत पक्षाची पत कमी झाली. त्यात आता पद्मसिहांच्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला हा मोठा दणका आहे. पण अजून आरोप सिद्ध झाले नसल्याने पक्षाला खासदार पद्मसिहांना वाचवण्याची भूमिका घ्यावी लागतेय. 'राष्ट्रवादीचा कायद्याच्या प्रक्रियेवर विश्वास आहे. पण कोर्टात ते दोषी ठरत नाहीत तोपर्यंत ते आमच्यासाठी निर्दोष आहेत', असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी म्हटलंय. पण पक्षाच्या दिल्लीतल्या या भूमिकेशी महाराष्ट्रातले काही नेते सहमत नाहीत. 'पद्मसिंह यांच्या अटकेमुळे पक्षाचं नुकसान आणि बदनामी होतेय', असं राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी म्हटलंय.यावरुन दिल्लीत एक, तर राज्यात वेगळी अशी भुमिका राष्ट्रवादीला घ्यावी लागतेय हेस्पष्ट दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस 10 व्या वर्षात पदार्पण करत असतानाच पद्मसिंह पाटलांच्या अटकेमुळं अडचणीत सापडली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2009 07:09 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2009 07:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close