S M L

शपथविधीला अंबानी, रतन टाटा, अमिताभ आणि सलमानही येणार

Samruddha Bhambure | Updated On: Oct 29, 2014 04:48 PM IST

शपथविधीला अंबानी, रतन टाटा, अमिताभ आणि सलमानही येणार

29 ऑक्टोबर : राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा 31 तारखेला वानखेडे स्टेडियमवर भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे. या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं आहे. यासाठी भाजपने वेगवेगळ्या विभांगासाठी अनेकांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे.

या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती मुकेश आणि अनिल अंबानी, रतन टाटा, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, अमिताभ बच्चन, सलमान खान यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. त्याशिवाय केंद्रीय मंत्री, देशातले उद्योगपती, बॉलिवूड स्टार, राज्यातले व्यापारी, परदेशातले राजदूत यांच्यासोबतच भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2014 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close