S M L

मराठवाड्यात 3 महिन्यांत 36 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Oct 29, 2014 08:22 PM IST

farmer suicide29 ऑक्टोबर : एकीकडे महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन करण्यासाठी हालचाल सुरू आहे. तर दुसरीकडे महिनाभरापासून विनासरकार असलेल्या महाराष्ट्रात एका कर्ज बाजारी शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठावाड्यातील पैठण तालुक्यात अंकुश घायाळ या शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवलीये. मराठवाड्यात गेल्या तीन महिन्यांमध्ये जवळपास 36 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यभरातला शेतकरी संकटात आहे. मराठवाड्यात कमी पावसामुळे शेतक-यांची अवस्था बिकट झालीय. शेतकर्‍याच्या आत्मत्येचं सत्र सुरूच आहे. खरिपाची जवळपास 70 टक्के पिकं हातची गेली आहेत. लोकसभा,विधानसभा आणि दिवाळी दसर्‍याच्या काळात शेतकर्‍यांच्या समस्येकडे कुणीही लक्ष दिलं नाही. मराठवाड्यातील पैठण तालुक्यातल्या हर्षी गावात अंकुश घायाळ या शेतकर्‍यानं आत्महत्या केली. त्यांच्यावर साडेपाच लाखाचं कर्ज होतं. त्यांच्या मागे त्यांची दोन मुलं आणि पत्नी आहेत. त्यांनी कर्ज काढून विहीर खोदली, पण पाणी लागलं नाही. त्यामुळे शेतातलं डाळींब आणि कपाशीचं पीक हाती येणार नाही, कर्ज कसं फेडणार या चिंतेत अंकुश यांनी आपल्या शेतातच विषारी औषधी घेऊन आपलं जीवन संपवलं. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि पत्नी यांच्यासमोर आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न निर्माण झाला. परभणीतल्या सूरपिंपरीमध्ये वसंत बाबर या 52 वर्षांच्या शेतकर्‍यानं आत्महत्या केलीय. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केलीय.

मराठवाड्यात आत्महत्येचं सत्र

औरंगाबाद -6

परभणी -14

नांदेड -3

हिंगोली जिल्हा- 7

उस्मानाबाद जिल्हा - 3

बीड जिल्हा - 3

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2014 06:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close