S M L

अमरावती एक्स्प्रेसचं इंजिन घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

Samruddha Bhambure | Updated On: Oct 30, 2014 09:24 AM IST

 अमरावती एक्स्प्रेसचं इंजिन घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

30 ऑक्टोबर :  गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेमार्गावर सुरू असलेली अपघातांची मालिका गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा अनुभवण्यास मिळाली. कल्याण स्टेशन जवळ आज (गुरूवारी) सकाळी कल्याण-अमरावती एक्स्प्रेसचे इंजिन एका डब्यासह रूळावरून घसरले. यामुळे अप मार्गावरील सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

मध्य रेल्वेमार्गावर अशाप्रकारच्या अपघाताची ही या आठवड्यातील तिसरी घटना आहे. अमरावती एक्स्प्रेस आज (गुरूवारी) सकाळी 5 वाजताच्या सुमारास कल्याण स्टेशनवर येत असताना हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. गेल्या काही दिवसांत सातत्याने सुरू असलेल्या या घटनांमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, या मार्गावरील आजूनही वाहतूक विस्कळीत असून अजूनही इंजिन हटवण्याचे काम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी लागणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2014 09:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close