S M L

मुंबई पालिकेचा फतवा, 'घरी डेंग्यूचे डास आढळले तर होईल अटक'

Sachin Salve | Updated On: Oct 30, 2014 05:37 PM IST

मुंबई पालिकेचा फतवा, 'घरी डेंग्यूचे डास आढळले तर होईल अटक'

30 ऑक्टोबर : 'एक मच्छर आदमी को...' अभिनेते नाना पाटेकर यांचा अजरामर डॉयलॉग कधीही न विसरणार...पण जर एक मच्छर तुम्हाला अटक करू शकतो असं म्हटलं तर कुणालाही विश्वास बसणार नाही. पण मुंबई महापालिकेनं असा अजब फतवाच काढलाय. जर तुमच्या घरात डेंग्यूचे डास किंवा अळ्या आढळल्या तर तुम्हाला अटक होईल असा फतवाच जारी केलाय.

राज्यात डेंग्यूनं थैमान घातलंय. त्यामुळे मुंबई महापालिकेनं डेंग्यूच्या वाढत्या साथीच्या पार्श्वभूमीवर एक अजब निर्णय घेतलाय. ज्यांच्या घरात डेंग्यूचे डास किंवा अळ्या आढळतील त्यांना अटक केली जाणार आहे. स्थायी समिती बैठकीत महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी ही माहिती दिली. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर यांनी या निर्णयला विरोध केलाय. जर पालिका हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे डास आढळले तर पालिका आयुक्तांना अटक करणार का असा सवाल त्यांनी केलाय. ज्येष्ठ दिग्दर्शक यश चोप्रा यांचा 2 वर्षांपूर्वी डेंग्यूनं मृत्यू झाला होता. अभिनेते ऋषी कपूरही सध्या डेंग्यूनं आजारी आहेत आणि गेल्या वर्षी 'मातोश्री' वरही डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होत्या. त्यामुळे महापालिकेनं डेंग्यूना आळा घालण्यासाठी थेट अटक करण्याचा निर्णय घेतलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2014 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close