S M L

बळीराजा हैराण, टोमॅटोचे भाव कोसळले

Sachin Salve | Updated On: Oct 30, 2014 09:51 PM IST

बळीराजा हैराण, टोमॅटोचे भाव कोसळले

tomato30 ऑक्टोबर : बळीराजा टोमॅटोचे भाव प्रचंड कोसळण्यामुळे अडचणीत सापडला आहे. टोमॅटोची अवाक जास्त झाल्याने टोमॅटोचे भाव कमालीचे कोसळले आहेत. नाशिकच्या बाजारात तर टोमॅटोची विक्री 60 रुपये जाळी म्हणजे केवळ 3 रुपये किलो एवढ्या मातीमोल दरानं होत आहे.

दिवाळीमुळे टोमॅटोची खरेदी फार झाली नाही, त्यामुळे बाजारात टोमॅटोची अवाक वाढली आणि त्यामुळेच भाव कोसळले आहेत. 20 किलोच्या विक्रीवरही शेतकर्‍याला केवळ 50 रूपये मिळतात. मात्र टोमॅटो पिकवण्याचा खर्चही यापेक्षा जास्त असल्याने राज्यातील शेतकरी धास्तावला आहे. नाशिक जिल्ह्यात नेहमी 2 लाख टन टोमॅटोचं उत्पादन होतं. यंदा उत्पादनात 30 टक्के वाढ झालीय. त्यातही  टोमॅटोचे 150 ट्रक वाघा बॉर्डरवर अडकून पडलेले आहेत. पाकिस्तानातील टोमॅटोची मागणीही घटलीय. त्यामुळे टोमॅटोचे देशांतर्गत बाजारातही भाव कोसळले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2014 09:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close