S M L

न्यूझीलंड आणि आयर्लंडमध्ये रंगणार टी-20ची पहिली लढत

10, नवी दिल्लीरुपा रमाणी आजपासून टी-20 वर्ल्डकपमध्ये सूपर-8ची धूम रंगणार आहे. न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यात पहिली लढत रंगणार आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पहिल्याच मॅचमध्ये आपल्या बॅटने दणका देणार्‍या ख्रिस गेलविरुध्द भारतीय टीमला विशेष रणनिती आखावी लागणार आहे. विंडीजच्या या कॅप्टनने स्पर्धेत आधीच भल्याभल्या बॉलर्सना धुळ चारली आहे. त्यामुळे आता भारतीय बॉलर्सना गेलसमोर अचूक टप्प्यात बॉलिंग करावी लागणार आहे. सुपर- 8मध्ये भारताला यजमान इंग्लंडचा दुसरा अडथळा पार करावा लागणार आहे. इंग्लंडकडे गेलसारखा तडाखेबाज बॅट्समन नसला तरी भारताला त्यांना कमी लेखून चालणार नाही. नेदरलॅन्डकडून इंग्लंडला पराभवाचा धक्का बसला होता. पण त्यानंतर पाकिस्तानविरूद्ध चांगली कामगिरी करत त्यांनी टी-20 मधली आपली कुवत दाखवून दिली आहे. त्यामुळे इंग्लंडविरूद्ध खेळताना भारताला गाफिल राहून चालणार नाही. खास करून केविन पीटरसनकडे त्यांना जास्त लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. त्यामुळे हा रविवार सगळ्यांसाठी सुपर संडे असणार आहे. कारण या मॅचमध्ये इंग्लंडला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा असणार आहे. पण त्याहीपेक्षा टीम इंडियाला जास्त पाठिंबा असणार आहे. सुपर 8मध्ये भारताची शेवटची मॅच सगळ्यात जास्त कठीण असेल. दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेत आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे आणि विजेतेपदासाठी फेव्हरेट टीम म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे. आफ्रिकन टीममधले जास्तीत जास्त प्लेअर्स आयपीएल स्पर्धेत चमकलेत आणि त्याचबरोबर इंग्लंडमध्ये त्यांनी आत्तापर्यंत एकही मॅच गमावलेली नाही. त्यामुळे मंगळवारी होणार्‍या फायनल मॅचच्या आधीच सेमी फायनलमधली आपली जागा पक्की करण्याकडे भारताचा कल असेल. कारण या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका भारताचा कठीण प्रतिस्पर्धी असणार आहे. एकूणच पुढचा आठवडा भारतीय टीमसाठी खरी कसोटी असणार आहे. यात भारतीय टीम अपेक्षांची पूर्तता करतेय की दबावाखाली खेळतेय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2009 03:36 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2009 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close