S M L

वानखेडे स्टेडियमबाहेर पाथर्डी हत्याकांडाचा निषेध

Sachin Salve | Updated On: Nov 1, 2014 11:51 AM IST

वानखेडे स्टेडियमबाहेर पाथर्डी हत्याकांडाचा निषेध

wankhede356331 ऑक्टोबर : पाथर्डी दलित हत्याकांड प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यश न आल्यामुळे दलित संघटनांनी आज देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सुरू असतांना वानखेडे स्टेडियम बाहेर निदर्शनं केली.

यावेळी नव्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 13 दिवस उलटूनही पाथर्डी जवखेडे हत्याकांड प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नाही. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत आज ठिकठिकाणी आज निदर्शनं करण्यात आली.

एकीकडे वानखेडे स्टेडियमवर शपथविधीसाठी लगबग सुरू होती. तर दुसरीकडे स्टेडियमच्या गेटवर दलित संघटनांनी आक्रमक होतं निदर्शनं केली. पोलिसांनी कारवाई करत आनंदराज आंबेडकरांसह आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2014 09:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close