S M L

आज खातेवाटप, खडसेंना कोणतं खातं मिळणार ?

Sachin Salve | Updated On: Nov 1, 2014 01:48 PM IST

आज खातेवाटप, खडसेंना कोणतं खातं मिळणार ?

khadase01 नोव्हेंबर : शानदार शपथविधी सोहळ्यानंतर आता दमदार खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. देवेंद्र फडणवीस यांच्यासह 10 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांचे खातेवाटप आज होणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच काल जाहीर केलंय.

त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्नशील असेलेले एकनाथ खडसे यांना आणि इतर नेत्यांना नेमकी कोणती खाती मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

भाजपचे नेते एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विष्णू सावरा,प्रकाश मेहता आणि चंद्रकांत पाटील मंत्रिपदाची शपथ घेतली. तर दिलीप कांबळे आणि विद्या ठाकूर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

शिवाय शिवसेना सोबत आल्यास त्यांच्या वाट्याला नेमकी कोणती खाती जातील हेही आजच्या खातेवाटपावर अवलंबून आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 1, 2014 01:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close