S M L

मुलगी झाली म्हणून पित्याने घोटला चिमुकलीचा गळा

Sachin Salve | Updated On: Nov 1, 2014 09:11 PM IST

मुलगी झाली म्हणून पित्याने घोटला चिमुकलीचा गळा

akola news01 नोव्हेंबर : दोन मुलींच्या जन्मानंतर पत्नीने पुन्हा तिसर्‍या मुलीला जन्म दिल्यामुळे पित्याने क्रौर्याची परिसीमा गाठत, एक महिन्याच्या कोवळ्या बालिकेचा गळा आवळून निर्घृण खून करून मृतदेह गावातल्या विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडलीये. अकोल्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील ही घटना उघडकीस आली.

अकोला जिल्ह्यातील मुर्तजापूर तालुक्यातल्या माना पोलीस स्टेशन हद्दीतल्या बोर्टा इथं राहणारा कैलाश आप्पाराव बुंधोट याच्या पत्नीने तिसर्‍या मुलीस जन्म दिला. दोन मुलींच्या पाठोपाठ तिसरी मुलगीच झाल्याने त्याने दारू पिणे सुरू केले. 28 ऑक्टोबरला कैलाशने दारूच्या नशेत आधी पत्नीशी भांडण केलं, त्यानंतर पत्नीला दोन मुलींसह घराबाहेर काढलं. त्यानंतर एका महिन्याच्या मुलीला स्वत: जवळ ठेवून, घराचे दार आतून बंद करून घेतले. त्यानंतर त्याने या निष्पाप बालिकेचा गळा दाबून खून केला. नंतर तिचा मृतदेह कपड्यामध्ये गुंडाळून, तो गावातील नागोबा मंदिरानजीकच्या विहिरीत फेकला. पित्याच्या या निर्दयी कृत्यामुळे कैलाशची पत्नी वर्षा हिने माना पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी कैलासला ताब्यात घेतले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 1, 2014 09:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close