S M L

मनसेच्या बालेकिल्ल्याला भगदाड, गीतेंसह 150 जणांचे राजीनामास्त्र

Sachin Salve | Updated On: Nov 4, 2014 02:47 AM IST

vasant_gite03 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राजीनामा सत्र सुरूच आहे. मनसेच्या नाशिकच्या बालेकिल्ल्याला आज भगदाड पडले आहे. मनसेचे नेते वसंत गीतेंनी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्यासह 150 पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले आहे. गीतेंनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलंय. मात्र दुसरीकडे मनसेचे नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

लोकसभेपाठोपाठ मनसेचं इंजिन विधानसभेतही घसरलंय. मनसेचे सर्वच दिग्गज नेते पराभूत झाले. फक्त जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांच्या रुपाने मनसेचा एकमेव आमदार राज्यातून निवडून आला. विधानसभेत लाजिरवाण्या पराभवामुळे मनसेचे सरचिटणीस प्रवीण दरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता मात्र नाशिकच्या बालेकिल्ल्यात मोठी पडझड झालीये. मनसेचे आमदार वसंत गीतेंनी प्रदेश सरचिटणीसपदाचा पदाचा राजीनामा दिला आहे. गींतेंनी आपला राजीनामा कृष्णकुंजवर पाठवला आहे. त्यांच्यासोबतच जिल्हाप्रमुख सचिन ठाकरे आणि प्रवक्ते अभिजित बगदे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. निवडणुकीत अपेक्षाभंग झाल्याने या नेत्यांनी पदांचे राजीनामे दिलेले आहेत. नेत्यांनी राजीनामे दिल्यानंतर त्याच्यापाठोपाठ मनसेंच्या 150 पदाधिकार्‍यांनीही पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारुन पदाचा राजीनामा दिला असल्याचं वसंत गीतेंचे स्पष्ट केलंय. तसंच आपण इतर कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नाही असंही वसंत गीते म्हणाले. तर मनसेचे नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील तर त्यांचं भाजपमध्ये स्वागत आहे अशी सुचक प्रतिक्रिया भाजपचे आमदार गिरीष महाजन यांनी दिली. पण गीतेंनी महाजन यांचा दावा खोडून काढलाय. मनसेचे कोणतेही नगरसेवक भाजपच्या संपर्कात नाही असा दावा गीतेंनी केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2014 06:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close