S M L

राजीनामानाट्याच्या पार्श्वभूमीवर गीतेंचं पुन्हा शक्तिप्रदर्शन

Sachin Salve | Updated On: Nov 3, 2014 06:01 PM IST

23Vasant gite03 नोव्हेंबर : नाशिकमध्ये मनसेचे नेते वसंत गीते यांचे राजीनामानाट्य पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन ठरत आहे. गीतेच्या राजीनाम्यानंतर मनसेच्या कार्यालयामध्ये मनसेच्या पदाधिकार्‍यांची रांग लागली आहे. पदाधिकार्‍यांना बोलवून राजीनाम्याच्या रजिस्टरवर त्यांच्या सह्या घेतल्या जात आहेत.

अद्यापर्यंत अधिकृतपणे त्यांची भूमिका मात्र आपण वैयक्तीक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं गीते यांनी राज ठाकरे यांना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटलंय. मात्र माध्यमांशी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तर पदाधिकार्‍यांनाही माध्यमांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आलाय. मनसेच्या नगरसेवकांची बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीला 37 पैकी 26 नगरसेवक बैठकीला हजर आहे. या बैठकीनंतर पुढील भूमिका ठरणार आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकी अगोदर गीतेंनी आपली नाराजीचा सूर लगावला होता. मात्र राज ठाकरेंनी तंबी दिल्यानंतर गीतेंनी तलवार म्यान केलं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2014 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close