S M L

...नाहीतर विरोधी बाकावर बसू, सेनेचा भाजपला अल्टिमेटम?

Samruddha Bhambure | Updated On: Nov 4, 2014 04:11 PM IST

...नाहीतर विरोधी बाकावर बसू, सेनेचा भाजपला अल्टिमेटम?

04 नोव्हेंबर : एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेला सत्तेची घाई नसल्याचे सांगत असले तरी दुसरीकडे शिवसेनेने भाजपला अल्टिमेटम दिल्याचं कळतं आहे. सात किंवा आठ तारखेपर्यंत शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी करावा, नाहीतर शिवसेना नऊ तारखेला विरोधीपक्षनेता घोषीत करणार असल्याची माहिती IBN लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेनेने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्रिपदासह 10 ते 12 मंत्रिपदांची त्यांची मागणी आहे. मात्र भाजप त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या आठ मंत्रिपदं देण्यास तयार असून त्यापैकी 4 कॅबिनेट तर 4 राज्यमंत्रिपदे असतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजप उपमुख्यमंत्रिपद द्यायला तयार नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

राज्यात येत्या 11, 12, 13 नोव्हेंबरला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार आहे. यावेळेला सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पहिल्या दिवशी होणार आहे. दुसर्‍या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड आणि तिसर्‍या दिवशी भाजप सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. या सर्व प्रक्रियेच्या आधी विरोधी पक्षनेत्याची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेवर भाजप काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लगालं आहे.

दरम्यान, शिवसेना नेते अनिल देसाई यांनीही 'आमचा पक्ष लवकरच सत्तेत सहभागी होईल' असा विश्वास व्यक्त केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2014 11:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close