S M L

सुरेश धस यांच्या बंगल्यावर अँटी करप्शन ब्युरोचा छापा

Samruddha Bhambure | Updated On: Nov 4, 2014 01:30 PM IST

सुरेश धस यांच्या बंगल्यावर अँटी करप्शन ब्युरोचा छापा

suresh dhas1

04 नोव्हेंबर :  अँटी करप्शन  ब्युरोने माजी मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या बंगल्यावर छापा टाकला आहे. या छाप्यात धस यांच्या बंगल्यातून एका भूखंडाशी संबंधित 4 महत्त्वाच्या फाईल्स जप्त केल्या आहेत.

पुण्यातील एका भूखंडाचं प्रकरण धस यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी तीन जणांना अटकही करण्यात आली असून त्यात एका कक्ष अधिकार्‍याचाही समावेश आहे. महसूल राज्यमंत्री असताना या प्रकरणी धस यांनी निकालही दिला होता. त्यासाठी धस यांच्या माणसानं लाच मागितल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे करण्यात आली होती. या प्रकरणात सुरेश धस यांच्यावरही संशयाची सुई आल्याने अँटी करप्शन  ब्युरोने धस यांच्या घरावर छापा टाकला.

एसीबीने कोर्टातून सर्च वॉरंट मिळवून काल सुरेश धस यांच्या बंगल्याची झाडाझडती घेतली. यामध्ये जमिनीच्या आदेशाची मूळ प्रत आणि सहकार खात्याशी संबंधित महत्त्वाच्या फाईल्स सापडल्याचं उघड झालं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2014 01:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close