S M L

पुढच्या वेळेस 180 आमदार घेऊन येईन -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Nov 4, 2014 06:58 PM IST

पुढच्या वेळेस 180 आमदार घेऊन येईन -उद्धव ठाकरे

04 नोव्हेंबर : यावेळी 63 आमदार निवडून आलेत पण पुढच्या वेळेस 180 आमदार घेऊन येईन, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्धव आपल्या सर्व 63 आमदारांसह आज एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ल्याला आले आहेत. यावेळी ते बोलत होते.

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेनं स्वबळावर विधानसभा लढवली. यंदा 'भगवी दिवाळी साजरी करणार' अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभांतून केली होती. मात्र जनतेनं आपला कौल देत कुणालाही एकहाती सत्ता दिली नाही. त्यामुळे सेनेनं स्वप्न अपूर्ण राहिलं. मात्र शिवसेनेनं मागिल निवडणुकीपेक्षा यंदा सर्वाधिक जागा जिंकल्यात. स्वप्न साकार होऊ न शकल्यामुळे नाराज झालेल्या उद्धव यांनी आज मरगळ झटकून काढली. प्रथेप्रमाणे खुद्ध उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व विजयी शिलेदारांना घेऊन एकविराच्या दर्शनाला आले. प्रत्येक निवडणुकीनंतर उद्धव आपल्या नवनिर्वाचित आमदार आणि खासदारांना घेऊन दर्शनाला जात असता. मुंबईतून निघण्याआधी सर्व आमदारांनी शिवाजी पार्कात जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तेत सहभागावरुन तणाव आहे. दोन्ही पक्षांमध्ये सध्या सत्तेत सहभागी होण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र अंतिम निर्णय कधी होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2014 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close