S M L

काँग्रेसचे प्रचाराचे 10 कोटी चोरीला?, पोलिसांत तक्रारही नाही

Sachin Salve | Updated On: Nov 4, 2014 05:05 PM IST

money found04 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतरही काँग्रेसच्या पुढच्या अडचणी संपलेल्या नाहीत. मुंबईत काँग्रेसचे प्रचारसाहित्यासाठीचे 10 कोटी रूपये चोरीला गेल्याची बाब आता समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या प्रभादेवीमधल्या घरून ही रोकड लंपास झाली. पण काँग्रेसने यावर सोयीस्करपणे मौन बाळगलं असून पोलिसांत तक्रारही दाखल केली नाही.

विधानसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवाला काँग्रेसचे नेते एकमेकांवर खापर फोडत आहे. पण प्रचारात कमी पडल्याची ग्वाहीही काँग्रेसचे नेते देत आहे. काँग्रेसकडून वेळीच रसद न मिळण्याचं आता उघड झालंय. मुंबईतील प्रभादेवी येथील माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या घरातून प्रचार साहित्यासाठीची तब्बल 10 कोटींची रक्कम चोरीला गेल्याचं उघड झालंय. दादर परिसरामध्ये काँग्रेसचे कार्यालय असून, तेथूनच जवळ असलेल्या प्रभादेवीमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेण्यात आला होता. हा फ्लॅट माणिकराव ठाकरे यांच्या नावावर घेण्यात आला होता. पक्षानं हा फ्लॅट माणिकरावांना भाड्यानं दिला होता, असं प्रदेश काँग्रेस सचिव भालचंद्र निकुंभ यांनी सांगितलंय. ही जबाबदारी पूर्णपणे माणिकराव ठाकरेंची आहे. त्यांनी आधी दिलेला राजीनामा हायकमांडने लवकर स्वीकारावा, असा हल्लाबोलही भालचंद्र निकुंभ यांनी केलाय.याबाबत पक्षांच्या वरिष्ठांना सांगितल्यानंतरही तक्रार दाखल करण्यात आली नाही. त्यामुळं हे प्रकरण दडपण्याचा काँग्रेस प्रयत्न करत असल्याचं बोलंल जातंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2014 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close