S M L

राज ठाकरेंचं एकेना कुणी, जळगावात 47 जणांचे राजीनामे

Sachin Salve | Updated On: Nov 5, 2014 08:43 PM IST

raj on modi news05 नोव्हेंबर : 'आजच्या परिस्थिती कोण-कोण माझ्यासोबत आहेत, हे मला कळेल' असा भावनिक टोकाचा निर्णय घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जळगावच्या मनसेसैनिकांनी पुन्हा एकाकी पाडलंय. जळगाव जिल्हाध्यक्षांसह 47 पदाधिकार्‍यांचे राजीनामे दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गळती लागलीय. नाशिकपाठोपाठ आता जळगाव मनसेमध्येही पडझड सुरू झालीय. मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी राजीनामा दिलाय. विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्यासह 47 पदाधिकार्‍यांनी अध्यक्ष राज ठाकरेंकडे आपले राजीनामे पाठवले आहेत.

दोनच दिवसांपूर्वी नाशिकच्या बालेकिल्ल्यात माजी आमदार आणि प्रदेश सरचिटणीस वसंत गीते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यासह 150 समर्थकांनी राजीनामा दिला होता. हे नाराजीनाट्य एवढ्यावरच थांबलं नाहीतर वसंत गीतेंनी सर्व समर्थकांची बैठक घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं.

परंतु, मनसेच्या नेत्यांनी सर्व नाराज समर्थकांची मनधरणी करण्यात यश मिळवलं. पण राज ठाकरे यांनी तडकाफडकी निर्णय घेत ज्यांनी ज्यांनी राजीनामे दिले त्या सर्वांचे राजीनामे स्वीकारले असल्याचं जाहीर करून टाकलं. यावेळी राज यांनी अशा परिस्थिती आपल्या सोबत कोण-कोण माझ्या सोबत आहेत हेही मला कळेल अशी भावनिक साद घातली होती. पण राज यांच्या या निर्णयाला मनसैनिकांनी वाटाण्याच्या अक्षदा लावल्यात आहेत. त्यामुळे राज आता याबद्दल काय निर्णय घेता हे पाहण्याचं ठरेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2014 04:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close