S M L

सेनेचा भाजपला नवा अल्टिमेटम, 7 तारखेला निर्णय घ्या !, नाहीतर...

Sachin Salve | Updated On: Nov 5, 2014 05:10 PM IST

uddhav_sena_ledar3205 नोव्हेंबर : शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार की नाही यावरून अजूनही सस्पेन्स कायम आहे. शिवसेना दोन वजनदार खात्यांसह 10 मंत्रिपदावर ठाम आहे. आता शिवसेना नेत्यांनी भाजपला पुन्हा एकदा 7 तारखेपर्यंतचा नवा अल्टिमेटम दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये.

भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करून मुख्यमंत्रिपदासह 10 मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पाडला. पण बहुमतासाठी भाजपला 15 दिवसांची मुदत आहे. त्यामुळे अल्पमतात असलेलं सरकार कुणाला सोबत घेणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. भाजपने आपला जुना मित्र शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी सुरू केलीये. पण आम्हाला सत्तेत येण्याची घाई नाही असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. पण दुसरीकडे सत्तेत सहभागाबद्दल सेनेनं मागणीचा तगादा लावलाय. काल मंगळवारी सात किंवा आठ तारखेपर्यंत शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी करावा, नाहीतर शिवसेना नऊ तारखेला विरोधीपक्षनेता घोषित करू असा अल्टिमेटम सेनेनं दिला होता.

शिवसेनेची उपमुख्यमंत्रिपदासह 10 ते 12 मंत्रिपदांची मागणी आहे. मात्र भाजप त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या आठ मंत्रिपदं देण्यास तयार असून त्यापैकी 4 कॅबिनेट तर 4 राज्यमंत्रिपदे असतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजप उपमुख्यमंत्रिपद द्यायला तयार नाही असा पवित्रा भाजपने घेतलाय. तर आज सेनेनं आपली नवी भूमिका मांडलीये. शिवसेनेला दोन वजनदार खाती हवी आहे. त्याचबरोबर 10 मंत्रिपदांवर शिवसेना अजूनही ठाम आहे. मंत्रिपदांसोबतच शिवसेनेला महत्त्वाची महामंडळंसुद्धा हवीये. 9 तारखेच्या बैठकीत शिवसेना याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं कळतंय. त्यामुळेच गटनेता द्यायचा की विरोधी पक्षनेता, हे आता 9 तारखेलाच ठरणार आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच महत्त्वाच्या खात्यांसह मंत्र्यांचा शपथविधी व्हावा, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय. तर शिवसेनेचा सत्तेतला सहभाग आणि खातेवाटप याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच निर्णय घेतील असं उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2014 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close