S M L

राम प्रधान समितीच्या अहवालात हसन गफूर यांच्यावर ठपका

16 जून राम प्रधान समितीच्या अहवालात हसन गफूर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. हसन गफूर यांच्याकडे दृश्य आणि प्रत्यक्ष नेतृत्वाचा अभाव होता. तसंच 26/11 च्या संपूर्ण कारवाई दरम्यान गफुर ट्रायडंट हॉटेल जवळ थांबून होते, असं राम प्रधान समितीने अहवालात नमूद केलं आहे. मात्र राम प्रधान समितीचं हे मत स्वीकारता येणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान मुंबई पोलिसांनी आपलं कर्तव्य चांगल बजावलं असल्यामुळे त्यांचा प्रमुख अपयशी असूच शकत नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. 26/11चा अहवाल तयार करताना समितीने हसन गफूर यांचे लेखी अभिप्राय रेकॉर्डवर घेतलेले नाहीत. प्रत्यक्षात मात्र हसन गफूर यांनी 26/11 च्या वेळी मुंबईतील घटनांचं योग्य प्रकारे योग्य रितीने हाताळल्या पण समितीने सहपोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. डीवायएसपी, एसीपीपासून ते डीजीपर्यंतची सर्व रिक्त पदं जुलैअखेरपर्यंत भरण्यात येतील. तर पीएसआयची पदं ऑक्टोबरपर्यंत भरण्यात येतील, अशी घोषणाही सरकारने यावेळी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2009 08:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2009 08:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close