S M L

'सेनेचा दबाव भाजपनं झुगारला, विश्वासदर्शक ठरावानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार'

Sachin Salve | Updated On: Nov 5, 2014 06:12 PM IST

Dev fadnavis05 नोव्हेंबर : आधी विश्वासदर्शक ठराव मगच मंत्रिमंडळ विस्तार करू अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलीये. पण मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं शिवसेनेची अडचण वाढली आहे. कारण त्याआधी शिवसेना नेत्यांनी भाजपला 7 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला होता.

शिवसेनेला दोन वजनदार खाती हवी आहेत आणि 10 मंत्रिपदांवरही शिवसेना ठाम आहे. मंत्रिपदांसोबतच शिवसेनेला महत्त्वाची महामंडळंसुद्धा हवीये. 9 तारखेच्या बैठकीत शिवसेनाअंतिम निर्णय घेणार आहे. त्यामुळेच गटनेता द्यायचा की विरोधी पक्षनेता, हे आता 9 तारखेलाच ठरणार आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच महत्त्वाच्या खात्यांसह मंत्र्यांचा शपथविधी व्हावा, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय. पण मुख्यमंत्र्यांनी आज आधी विश्वासमत ठराव मगच मंत्रिमंडळ विस्तार हे स्पष्ट केल्यामुळे शिवसेनेची अडचण वाढली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2014 06:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close