S M L

एमआयएम आणि अतिरेक्यांमध्ये फरक काय? -प्रणिती शिंदे

Sachin Salve | Updated On: Nov 6, 2014 02:58 PM IST

एमआयएम आणि अतिरेक्यांमध्ये फरक काय? -प्रणिती शिंदे

praniti_shinde_on_mim05 नोव्हेंबर : एमआयएम ही संघटना आणि त्यांचे नेते देशविरोधी वक्तव्य करत असल्यानं अतिरेकी आणि एमआयएम संघटनेत फारसा फरक नाही, असं वादग्रस्त विधान सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केलंय. त्या सोलापुरात बोलत होत्या.

विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्यमधून एमआयएमच्या तौफिक शेख यांनी आमदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना चांगलीच लढत दिली होती. त्यामुळे शिंदे कुटुंबाननं निवडणुकीनंतर एमआयएमला लक्ष्य केलंय. एमआयएम संघटना ही कोणत्या समाजाच्या विरोधात आहे याबद्दल मी बोलत नाही. पण ते देशाच्या विरोधात आहे. त्यामुळे देशविरोधी वक्तव्य करणार्‍यांना देशात जागा नसावी. मग अतिरेकी आणि त्यांच्या फरक तरी काय ? असा वादग्रस्त सवाल प्रणिती शिंदेंनी उपस्थित केला. मात्र, आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा एमआयएम पक्षाने आक्षेप घेतलाय. कालपर्यंत काँग्रेसचं काम करताना आम्ही अतिरेकी नव्हतो का ? एमआयएममध्ये जाताच देशद्रोही ठरलो का, असा सवाल प्रणिती यांचे प्रतिस्पर्धी आणि एमआयएमचे उमेदवार तौफिक शेख यांनी केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2014 09:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close