S M L

आधी मंत्रिपदं, मग पाठिंबा !

Sachin Salve | Updated On: Nov 6, 2014 07:18 PM IST

आधी मंत्रिपदं, मग पाठिंबा !

06 नोव्हेंबर :भाजपबरोबर सत्तेत सहभागाबद्दल शिवसेनेनं अजूनही 'वेट अँड वॉच' भूमिका घेतलीये. आधी शपथ, मग विश्वासदर्शक ठराव अशी भूमिका शिवसेनेनं कायम ठेवली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सेनेला आणखी एक पद मिळावं आणि राज्यातही विश्वासदर्शक ठरावापूर्वी सेनेच्या काही नेत्यांना मंत्रिपदाची शपथ द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. त्यामुळे केंद्रातल्या मंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेत पुन्हा मतभिन्नता दिसून आली आहे. आता सेनेच्या प्रस्तावाबाबत भाजप काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलंय.

भाजपला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्य नेत्यांची तातडीने आज (गुरुवारी) शिवसेना भवनात बैठक बोलावली होती. सरकारमध्ये सहभागी व्हायचं की नाही यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. विश्वासदर्शक ठरावापूर्वी सेनेच्या काही नेत्यांना मंत्रिपदाची शपथ द्या, अशी शिवसेनेची भाजपकडे मागणी आहे. पण आधी विश्वासदर्शक ठराव आणि मग मंत्रिमंडळाचा विस्तार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानं शिवसेनेची अडचण वाढलीये. त्यामुळेच उद्धव यांनी ही बैठक घेतली.

पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. सेनेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातआणखी एक पद पाहिजे आहे. आणि राज्यातही विश्वासदर्शक ठरावापूर्वी सेनेच्या काही नेत्यांना मंत्रिपदाची शपथ द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेनेला माहिती नाही. सर्व निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत ते योग्य वेळी निर्णय जाहीर करतील. तोपर्यंत थांबा आणि वाट पाहा अशी प्रतिक्रिया नीलम गोर्‍हेंनी दिली. शिवसेनेनं अजून निर्णय न घेतल्यामुळे भाजपच्या गोटात आता अस्वस्थता वाढत चाललीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2014 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close