S M L

काँग्रेसचा गटनेता निवडीचे सर्वाधिकार सोनिया गांधींना

Sachin Salve | Updated On: Nov 6, 2014 06:16 PM IST

767sonia_gandhi06 नोव्हेंबर :  विधानसभेच्या गटनेत्याच्या निवडीसाठी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत यासंबंधीचे सर्वाधिकार सोनिया गांधींना देण्यात आला आहेत हा ठराव एकमताने मंजूर झालाय.

गटनेत्याचं नाव आजंही जाहीर होऊ शकतं असं काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरेंनी माहिती दिलीये. या बैठकीला विधानसभेचे 39 आमदार हजर राहिले. तर कालिदास कोळंबकर, सुरूपसिंग नाईक आणि नसिम खान गैरहजर राहिले. त्याबरोबरच विधानपरिषदेचे 22 आमदार हजर होते. केंद्रीय निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनी या सर्व आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2014 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close