S M L

प्रणिती शिंदेंचा पलटवार, ओवेसींची माफी मागण्याचा तर प्रश्नच नाही !

Sachin Salve | Updated On: Nov 6, 2014 09:37 PM IST

प्रणिती शिंदेंचा पलटवार, ओवेसींची माफी मागण्याचा तर प्रश्नच नाही !

praniti_shinde_new406 नोव्हेंबर : मी कोणत्याही समाजाविरोधात बोललेली नाही. त्यामुळे माझ्या विधानावर मी ठाम आहे. त्यामुळे ओवेसींची माफी मागण्याचा तर प्रश्नच येत नाही अशी रोखठोक भूमिका काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडली. जो कुठलाही पक्ष माझ्या देशाच्या विरोधात बोलत असेल तर त्याच्याविरोधात मी बोलेनच असंही प्रणिती शिंदेंनी ठणकावून सांगितलं. तसंच माझं हे विधान हे व्यक्तिगत असून पक्षाचं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'एमआयएम आणि अतिरेकी यांच्यात फरक नाही'असं वादग्रस्त विधान करून सोलापूरच्या काँग्रेसच्या आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा कन्या प्रणिती शिंदेंनी एकच खळबळ उडवून दिली. एमआयएम ही संघटना आणि त्यांचे नेते देशविरोधी वक्तव्य करत असल्यानं अतिरेकी आणि एमआयएम संघटनेत फारसा फरक नाही. एमआयएम संघटना देशाच्या विरोधात बोलते, त्यामुळे अशा देशविरोधी वक्तव्य करणार्‍यांना देशात जागा नसावी असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं होतं. मात्र प्रणिती शिंदेंची टीका एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असादुद्दीन ओवेसी यांना चांगलीच झोंबली. आमची भाषणं जर आक्षेपार्ह वाटत असतील तर पोलिसांकडे तक्रार करावी. प्रणिती यांनी आपलं विधान मागे घ्यावं अन्यथा बदनामीचा खटला दाखल करू असा इशाराच ओवेसी यांनी दिला. पण ओवेसींच्या इशार्‍याला प्रणिती यांनी केराची टोपली दाखवली. आयबीएन लोकमतशी बोलतांना प्रणिती यांनी ओवेसींना खणखणीत प्रत्युत्तर दिलं. "मी, कोणत्याही समाजाच्या विरोधात बोललेली नाही. मी फक्त एका पक्षाच्या धोरणाच्या विरोधात बोलली आहे. त्यांची धोरण देशाला आणि समाजाला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. भगवा आणि हिरव्या वादामुळे आजच्या तरुण पिढीची डोकं भडकावली जात आहे. पण आपण भारतीय आहोत याचा विचार कधी कुणी करत नाहीये. त्यामुळे माझ्या देशाच्या विरोधात कुणी बोलत असेल तर अर्थात मी त्यांच्या विरोधात बोलेन. मग तो कोणताही पक्ष असो त्याचा मी निषेध करणारच, ओवेसींची माफी मागण्याचा तर प्रश्नच येत नाही" असा पलटवार प्रणिती शिंदेंनी केला. तसंच एमआयएमबद्दल हे माझं एकटीचं नाही, तर अनेक जणांचं मत आहे त्यांच्या भाषणातून ते देशविरोधी विधानं करतात हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ही काँग्रेसची नव्हे तर माझी वैयक्तिक प्रतिक्रिया आहे अशी जबाबदारीही प्रणितींनी घेतली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2014 09:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close