S M L

रायडूची विजयी इनिंग, श्रीलंकेला धोबीपछाड

Sachin Salve | Updated On: Nov 6, 2014 11:41 PM IST

रायडूची विजयी इनिंग, श्रीलंकेला धोबीपछाड

Ambati Rayudu06 नोव्हेंबर : अहमदाबादमध्ये रंगलेल्या भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या दुसर्‍या वन डेत भारताने श्रीलंकेचा 6 विकेटने दणदणीत पराभव केला आहे. सलग दुसर्‍या वन डेत भारताने श्रीलंकेला धोबीपछाड दिलाय. शिखर धवन आणि अंबाती रायडूच्या धडाकेबाज कामगिरीच्या बळावर भारताने विजय मिळवला.

टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा लंकेनं निर्णय घेतला. कुमार संगकारा आणि अँजेलो मॅथ्यूजच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर लंकेनं भारतासमोर 275 रन्सचं टार्गेट ठेवलं. संगकारानं 61 तर मॅथ्यूजनं 92 रन्स ठोकले. 275 धावांचा पाठलाग करणार्‍या भारताची सुरुवात खराब झाली. अजिंक्य रहाणे झटपट रन करण्याच्या नादात आऊट झाला. तर त्यानंतर शिखर धवन आणि अंबाती रायडूच्या धुवाँधार कामगिरीच्या जोरावर भारतानं विजयाचा पाया रचला. धवननं 79 तर रायडूनं नॉट आऊट 121 रन्स केले तर विराट कोहलीनं 49 रन्स केले. या विजयाबरोबरच पाच वन डेच्या या सीरिजमध्या टीम इंडियानं 2-0 अशी आघाडी घेतलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2014 11:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close