S M L

मुंबईकरांचे मेगा'हाल',रविवारसोबतच शनिवारीही मेगाब्लॉक

Sachin Salve | Updated On: Nov 7, 2014 01:49 PM IST

333mumbai_local_07 नोव्हेंबर : दर रविवारी मुंबईकरांचे मेगा हाल करणारा मेगाब्लॉक आता शनिवारीही सहन करावा लागणार आहेत. मुंबईत आता रविवारसोबतच शनिवारीही मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर उद्या (शनिवारी) ठाणे ते कल्याण स्टेशनदरम्यान सकाळी 9.30 ते 11.45 पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यावेळी सीएसटीकडून कल्याणकडे जाणार्‍या फास्ट ट्रॅकवरच्या लोकल स्लो ट्रॅकवरून धावतील. त्यामुळे या फास्ट लोकल ठाणे-कल्याणदरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. या मेगाब्लॉकमुळे सीएसटीहून सुटणार्‍या आणि सीएसटीकडे जाणार्‍या लोकल्सच्या 18 फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2014 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close