S M L

मुंबईला नवा सीईओ मिळण्याची दाट शक्यता

Sachin Salve | Updated On: Nov 7, 2014 06:43 PM IST

मुंबईला नवा सीईओ मिळण्याची दाट शक्यता

mumbai ceo07 नोव्हेंबर : महाराष्ट्राची राजधानी मुंबईला लवकरचा नवा सीईओ (विशेष कार्यकारी अधिकारी) मिळण्याची दाट शक्यता आहे. अतिरिक्त मुख्य सचिवांंच्या दर्जाचा हा अधिकारी असेल. मुख्य सचिवांच्या खालोखाल या अधिकार्‍याला अधिकार असतील.

मुंबईतल्या विकासासंदर्भात सुरु असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा समन्वय राखण्यासाठी या अधिकार्‍याची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी दिली आहे. या सीईओची नेमणूक करण्याला प्राधान्य राहील असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. विकासासंदर्भात एकाच वेळी सुरू असलेल्या योजनांमध्ये सध्या ताळमेळ नसल्याने नागरिकांची गैरसोय होते त्यामुळेच अशा सर्व खात्यांशी समन्वय साधण्याचं काम एकाच अधिकार्‍याकडे दिली जाणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2014 06:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close