S M L

शिवसेनेकडून अनिल देसाईंचं नाव केंद्रीय मंत्रिपदासाठी निश्चित ?

Sachin Salve | Updated On: Nov 8, 2014 07:26 PM IST

anil desai08 नोव्हेंबर : उद्या रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आलाय. आधी राज्यातला तिढा सोडवा मग केंद्राचं बघू अशी भूमिका सेनेनं घेतलीये. मात्र शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिपदासाठी अनिल देसाई यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. अनिल देसाई दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अजून निर्णय घेतला नसल्यामुळे सस्पेन्स कायम आहे. उद्धव ठाकरे संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर करतील असं कळतंय.

शिवसेना आणि भाजपमधील चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसेनेनं 9 तारखेला निर्णय जाहीर करणार अशी भूमिका घेतली होती. त्यातच रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आल्यामुळे शिवसेनेपुढे पेच निर्माण झाला. भाजपने राज्यातील सत्तेत सहभागाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून तशी ऑफरही दिली. मात्र आधी राज्यातला तिढा सोडवा अशी भूमिका सेनेनं घेतली. आज झालेल्या बैठकीत भाजपने दोन मंत्रिपदाची ऑफर दिली असून ती पद कुणाला द्यावी यावर चर्चा झाली. शिवसेनेकडून अनिल देसाई यांच्या नावावर एकमत झाल्याचं कळतंय. उद्याच्या शपथविधीसाठी अनिल देसाई रवाना झाले आहे. मात्र शपथविधीत सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय अजून झाला नाही. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी अंतिम निर्णय जाहीर करतील असं सेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2014 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close