S M L

अखेर समझोता, सेनेला 5 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्रिपदं?

Sachin Salve | Updated On: Nov 8, 2014 07:22 PM IST

uddhav_sena_ledar3208 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेत अखेर समझोत्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेना राज्यातल्या भाजप सरकारमध्ये सहभागी होऊ शकतं. शिवसेनेला राज्यात 5 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्रिपदं मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलीय.

राज्यात हा तोडगा निघाल्यास उद्या रविवारी होणार्‍या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातही सेनेला आणखी दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. अनिल देसाईंचं नाव शिवसेनेनं निश्चित केलंय. त्यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या कोट्यातून सुरेश प्रभूंना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं. शिवसेनेचे केंद्रातले मंत्री अनंत गीते सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी गेले आहेत. अनिल देसाईंचं नाव ते पंतप्रधानांना सुचवतील. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेच्या सत्ता सहभागाबद्दल विचारलं असता सगळं नीट होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

सेनेत नाराजीनाट्य

भाजप आणि शिवसेनेत जुळत असल्याची चिन्हं असतानाच शिवसेनेत मात्र नाराजीनाट्य सुरू झालंय. अनिल देसाई यांचं नाव केंद्रात मंत्रिपदासाठी सुचवल्यानं सेनेचे अनेक खासदार नाराज आहेत. दुसरीकडे सुरेश प्रभू यांच्या रुपात अनंत गीते यांच्यानंतर कोकणाला केंद्रात दुसरं मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले खासदार नाराज झालेत. त्यामुळे शिवसेना नेतृत्वापुढच्या अडचणी वाढल्यात आहेत. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्रिपदासाठी दावा केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2014 07:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close