S M L

केंद्रात मंत्रिपद, राज्यात सस्पेंस कायम

Samruddha Bhambure | Updated On: Nov 9, 2014 02:50 PM IST

केंद्रात मंत्रिपद, राज्यात सस्पेंस कायम

08 नोव्हेंबर :  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज रविवारी होणार्‍या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींनी कमालीचा वेग आला आहे. राज्यात शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार का, यावरून सस्पेंस कायम आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात मात्र शिवसेना सहभागी होणार आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर अनिल देसाई नवी दिल्लीला रवाना झाले. मात्र त्यांना कोणतं मंत्रिपद दिलं जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, शिवसेना उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रीपदावर ठाम आहे. ही पदं द्यायला भाजपनं मात्र नकार दिलाय. आज होणार्‍या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पुन्हा महाराष्ट्राबाबत चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. तर शिवसेनेनं कुठल्याही अटी-शतीर्ंशिवाय भाजप सरकारला पाठिंबा द्यावा, मंत्रिपदांबाबत विश्वासदर्शक ठरावानंतर चर्चा करता येईल, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही म्हटलं आहे. शिवसेना विधिमंडळ गटाचीही आज दुपारी चार वाजता बैठक होत आहे. पण, या बैठकीत युतीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता कमीच आहे. आजच्या बैठकीत फक्त गटनेता निवडला जाईल, असं सांगण्यात येत आहे. एकूणच शिवसेनेचं दबावतंत्र यशस्वी ठरतं की शिवसेना विरोधी बाकावर बसते, हे आता काही दिवसातच स्पष्ट होईल.


Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2014 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close