S M L

शपथविधीवर शिवसेनेचा बहिष्कार, एनडीएतून बाहेर?

Samruddha Bhambure | Updated On: Nov 9, 2014 05:30 PM IST

modi-uddhav

09  नोव्हेंबर  : अखेरच्या क्षणापर्यंत घोळ घातल्यानंतर शिवसेनेनं केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत पोहोचलेले खासदार अनिल देसाई यांना माघारी परतण्याचे आदेश दिले. त्यामुळे देसाई एअरपोर्टवरूनच माघारी फिरले. त्यामुळे शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना विधिमंडळ गटाची संध्याकाळी बैठक होत आहे. या बैठकीत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय होऊ शकतो. राष्ट्रवादीबाबतची भूमिका स्पष्ट केली नसल्यानं सहभाग होणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली. भ्रष्टवादी अशी टीका करणार्‍या राष्ट्रवादीशीच भाजपची छुपी युती आहे, असा आरोपही शिवसेनेनं केला. तर देसाईंना केंद्रात राज्यमंत्रिपद मिळणार असल्यानं शिवसेना नाराज असल्याचंही बोललं जात आहे.

राज्यात सत्तेमध्ये वाटा द्या, मग केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेऊ, असा पवित्रा शिवसेनेनं घेतला होता. तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्याचं पाहू अशी भूमिका भाजपनं घेतली होती. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे उद्धव ठाकरे यांना दाद देत नाहीत, असा आरोप खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. तर महाराष्ट्राविषयी पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी सांगितले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2014 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close