S M L

दीपक मानकर यांच्या अटकपूर्व अर्जावर होणार सुनावणी

17 जून अद्वैत मेहता पुण्यातले काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी कोर्टाकडे अटक पूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. त्या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. शुक्रवार पेठेतल्या यशवंत नातू यांच्या वाड्याची जागा बळकावल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी दीपक मानकर अटक केली होती. आता तर पुणे पोलिसांनी जमीन बळकावल्याच्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. या प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असंही पुणे क्राईम ब्रांचने सांगितलं आहे.शुक्रवार पेठेतील वाड्याची जागा धमकी देऊन घेतल्याची तक्रार यशवंत नातू यांनी पुण्याच्या खडकी पोलीस ठाण्यात केली होती. मीडियाने हे प्रकरण उचलल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी बिल्डर सुधीर कर्नाटकी, काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यासह अकरा जणांविरुदिध गुन्हा दाखल केला. त्या अकराही जणांना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. आम्ही या संदर्भात सर्व रेकॉर्डस् तपासत आहोत. चार पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहे. लवकरच आरोपींना अटक करू, अशी ग्वाही पुण्याचे पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांनी दिली आहे.या संपूर्ण प्रकरणात तक्रारकर्ते यशवंत नातू यांनी दीपक मानकर यांना काँग्रेस भवनात नेऊन धमकावल्याचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. महात्मा गांधींच्या तत्त्वांवर उभारलेल्यस काँग्रेस भवनात अशा प्रकारची घटना घडल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागला आहे. या संपूर्ण प्रकरणात काँग्रेसच्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल होऊनही काँग्रेस पक्षाने आतापर्यंत दीपक मानकर यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने खळबळ उडाली आहे. यावर ' काँगे्रस भवनात अशा गोष्टींना थारा देण्यात येत नाही. हे आरोप सिद्ध झाले तर कारवाई करण्यात नक्कीच यश येईल, असं काँग्रेसचे शहर अध्यक्ष अक्षय छाजेड यांचं म्हणणं आहे. दीपक मानकरसह बिल्डर कर्नाटकी आणि माजी नगरसेवरक दत्ता सागरे यांनीही अटकपूर्व जामिनासाठी पुणे सेशन कोर्टात अर्ज केला आहे. मात्र, आता दीपक मानकर यांना अटक होणार का आणि त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल काय याची उत्सुकता पुणेकरांना लागली आहे. कारण पुण्यातल्या बाणेर इथल्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाणेरच्या जागेवरून अशोक गुप्ता आणि दीपक मानकर यांच्यात वादही सुरू होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2009 01:52 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2009 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close