S M L

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

Sachin Salve | Updated On: Nov 9, 2014 08:20 PM IST

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

अपडेट

 - हिंदुत्ववादी शक्तींचं विभाजन होऊ नये, ही आजही इच्छा - उद्धव ठाकरे

- आम्ही कुणाला बांधील नाही -उद्धव ठाकरे

- सत्ता असो वा नसो मराठी माणसासाठी काम करत राहणार -उद्धव ठाकरे

- अनंत गीतेंचा निर्णय लवकरच कळेल -उद्धव ठाकरे

- सुरेश प्रभू भाजपमध्ये गेले हे दुर्देव -उद्धव ठाकरे

- भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर विरोधी बाकावर बसणार -ठाकरे

- लाचारी पत्कारून सत्तेत सहभागी होणार नाही -उद्धव ठाकरे

- विधानसभेचा अध्यक्षाची निवड झाल्यावरच पाठिंब्याचा निर्णय

- 12 नोव्हेंबर रोजी निर्णय स्पष्ट होईल -उद्धव ठाकरे

- आजपर्यंत काय घडलं कसं घडलं हे सगळं तुम्हा सगळ्यांना माहित आहे -उद्धव ठाकरे

- हिंदू संपवण्याची ताकद वाढत आहे, ही शक्ती वाढत आहे -उद्धव ठाकरे

- शरद पवारांनी अगोदरच भाजपला पाठिंबा जाहीर केलाय -उद्धव ठाकरे

- भाजप जर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार असेल तर आम्हाला भाजपसोबत जाणं अवघड जाईल -उद्धव ठाकरे

- राष्ट्रवादीचा पाठिंबा जर भाजपनं घेतला तर शिवसेना विरोधी पक्षातच बसणार, उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

- भाजपनं आधी स्पष्ट करावं राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार आहात की नाही ?-उद्धव ठाकरे

- महाराष्ट्राचा अपमान होत असेल तर आम्ही विरोधी पक्षात बसू -उद्धव ठाकरे

- शिवसेना हिंदुत्वाला कायम साथ देणार -उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या सर्व आमदारांचा विरोधात बसण्याचा उद्धव ठाकरेंना आग्रह

- एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड

- शिवसेनाभवनाबाहेर अमित शहा मुर्दाबादच्या घोषणा

- शिवसैनिकांची भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

- शिवसेना खासदार अनिल देसाई मुंबईत दाखल

- शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत

- उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरेही सेनाभवनात पोहचले

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2014 07:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close