S M L

मला डॉक्टर व्हायचंय...!, 'ती'च्या जिद्दीची कहाणी

Sachin Salve | Updated On: Nov 9, 2014 08:55 PM IST

मला डॉक्टर व्हायचंय...!, 'ती'च्या जिद्दीची कहाणी

vardha_nandini09 नोव्हेंबर : आपली मुलगी डॉक्टर बनावी असं स्वप्न पाहणार्‍या आई वडिलांसाठी पैशाची सर्वात मोठी अडचण असते. परंतु वर्ध्यातील एका मांगगारोडी समाजातील दाम्पत्याने मुलगी नंदिनीला डॉक्टर बनविण्याची जिद्द पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. समाजातील सहकारी व

मित्रांनीही या कामात मदतीचा हात दिला. त्यामुळेच नंदीनी आज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. एका दाम्पत्याच्या जिद्दीने , समाजाच्या पुढाकाराने मांगगारोडी समाजाची मुलगी डॉक्टर बनते आहे. पण, आता खरी गरज आहे. ती पुढच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची...

मेडिकलचे शिक्षण म्हटलं की, अमाप खर्च हे गृहीतच धरले जाते. पण अवाढव्य खर्चाला पैसा उभारायचा कसा असाही प्रश्न निर्माण होतो. आणि अशातच मांगगारोडी समाजाची मुलगी डॉक्टर बनू पाहते म्हटल्यावर पैसा येणार कुठून. होय कान साफ करणार्‍या, चाकरी करणार्‍या मांग गारोडी समाजाची मुलगी डॉक्टर बनत आहे. काबाड कष्ठ करून वाढवलेल्या नंदिनीला आई वडिलांनी पूर्वीपासूनच इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले. 12 वीनंतर मेडिकलला नंबर लागला पण पैसे नसल्याने माघार घेण्याची वेळ आली. पण ऐन वेळी समाजाने पुढाकार घेतला आणि नांदे दाम्पत्याची झोळी पैश्याने भरली. उरलेले सहकार्य जवळच्या मित्रांनी केले. आज नंदिनी मेडिकलमध्ये शिकते आहे.

मांगगारोडी समाज हा अतिशय मागास समाज आहे. मुलगी डॉक्टर होते आहे ही समाजातील फार दुर्मिळ बाब आहे. माझ्या समाजातील

मुलांनी शिक्षणात पुढे जावे अशी नंदिनी इच्छा व्यक्त करते. सरकारने दुर्लक्ष केलेल्या या समाजाकडे लक्ष देण्याची गरज आहे. डॉक्टर बनून समाजसेवा करण्याची नंदिनीची धडपड कितपत यशस्वी ठरते. की तिला मध्येच पैशांअभावी शिक्षण सोडावे लागते अशी भीती तिची आई व्यक्त करते आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2014 06:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close