S M L

शिवसेनेनं मोदींवर विश्वास ठेवायला पाहिजे होता -फडणवीस

Sachin Salve | Updated On: Nov 9, 2014 09:40 PM IST

शिवसेनेनं मोदींवर विश्वास ठेवायला पाहिजे होता -फडणवीस

fadanvis_on_sena09 नोव्हेंबर : केंद्रीय मंत्रिपद देऊन सुद्धा शिवसेनेनं ते नाकारलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निमंत्रण देऊन सुद्धा पलीकडेच्या बाबी योग्य प्रकारेच होतील असा विश्वास शिवसेनेनं ठेवायला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच सत्तेत सहभागाबाबत जी काही चर्चा आहे. त्यावरच चर्चा व्हावी. पण पद, संख्या, खाती याच्यावर आधारीत चर्चा होऊ नये अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

भाजपने ज्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या राष्ट्रवादीचा पाठिंबा जर घेतला तर आम्ही विरोधी बाकावर बसू अशी भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली. सेनेच्या भूमिकेनंतर भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीडियाशी बोलतांना सेनेच्या निर्णयावर दु:ख व्यक्त केलं. शिवसेनेच्या समंतीनेच अनिल देसाईंचं नाव मंत्रिपदाच्या शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे पाठवण्यात आलं होतं. पण ऐन वेळी अनिल देसाई अनुपस्थीत राहुन शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. हे आमच्या करिता दुख:द आणि दुर्देवी आहे. खरं तर पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवून सरकारमध्ये सामिल व्हायला हवं होतं अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. नरेंद्र मोदींकडून निमंत्रण आल्यानंतर पलीकडच्या सगळ्या बाबी योग्य प्रकारेच होतील असा विश्वास सेनेनं ठेवायला हवा होता. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याबाबतची जी काही चर्चा आहे. जे काही तात्विक मुद्दे आहे. त्यावरच चर्चा व्हावी. पण पद, संख्या, खाती याच्यावर आधारीत चर्चा होऊ नये असं आमचं मत आहे असं फडणवीस म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2014 09:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close